आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाशी बेईमानी होय- डॉ भरांडे* महापदयात्रा निमित्त तयारी सभेत प्रतिपादन..!


जिल्हा/ प्रतिनिधी:- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र तालुका शाखा कंधारच्या वतीने ‌ मौजे बारुळ येथे एका सभेची आयोजन करण्यात आले होते.

या सभेत डॉ. रामचंद्रजी भरांडे सर यांनी मार्गदर्शन करत असताना,ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकडे मोर्चे व आंदोलन करणे अत्यंत गरजेचे आहे. उपवर्गीकरणाचा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. परंतु काही जात समुहांनी जाणीवपुर्वक आरक्षण उपवर्गीकरणाला पोट भरलेले व जातव्देषी राजकीय नेते विरोध करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाशी बेईमानी करत आहेत.अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभवंचित जात समुहाना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सुध्दा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

 आता महाराष्ट्रातील स्वाभिमानी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आरक्षण उपवर्गीकरण करण्याविषयी महापदयात्रा धर्माबाद येथुन येत्या दिनांक ११जुन पासुन सुरुवात होईल.अखेर दिं. ६ जुलै रोजी आझाद मैदानावर महाआक्रोश  मोर्चा काढला जाईल.यासाठी समाजाने सहभागी झाले पाहिजे. समाज बांधवांनी घरात बसुन जर आपला वेळ वाया घातला तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. यासाठी राज्य सरकारला धारेवर धरत विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव गट निर्माण करावा लागतो आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

ईमानदारी पुर्वक जीवाची बाजी लावत एक महिनाभर महापदयात्रा घेऊन निघालो आहोत. असे ही शेवटी आवाहन केले आहे. या सभेत कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबदादा पवार, गणपतराव रेड्डी,अशोक गायकवाड, धोंडोपंत बनसोडे, प्रकाश नन्नुरे, हनमंत घोरपडे आदीची समायोजित भाषणे केली यावेळी सुत्रसंचालन भाऊसाहेब कांबळे तर शेवटी आभार प्रदर्शन कृष्णकांत गायकवाड यांनी केलेल्या सभेला बारुळ परिसरातील समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर  उपस्थिती होती. या सभेसाठी संभाजीराजे वाघमारे, चंद्रकांत कांबळे आदींनी परिश्रम घेतले होते.