हिमायतनगरच्या उज्वल भविष्यासाठी भाजपाला निवडून द्या :- संजय कोडगे

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ भाजपाची कॉर्नर बैठक संपन्न.....

हिमायतनगर प्रतिनिधी/- नगरपंचायत सर्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हिमायतनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांची हिमायतनगर शहरात दि 24 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यलयात कॉर्नर बैठक   संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शन करताना कोडगे यांनी असे सांगितले कि हिमायतनगरच्या भविष्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी शहरातील मायबाप जनतेने येत्या 2 डिसेंबर ला भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले...

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरात भारतीय जनता पार्टीची ताकद सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी ऐनवेळी या ठिकाणी मोठी खेळी करत हिमायतनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वांचा परिचयाचा व संयमी नेतृत्व असलेले हुशार व्यक्तिमत्व डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांचे नाव जाहीर करून त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे 10 उमेदवार त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे या सर्वांना मोठ्या ताकतीने निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सर्व टीम शहरात मोठी ताकत लावत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे यांनी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी शहरातील बस स्थानक परिसरात कार्यकर्ता सह मतदारांची एक कॉर्नर बैठक घेतली या कॉर्नर बैठकीला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला 

यावेळी त्यांनी शहरातील मतदारांना आव्हान केले की हिमायतनगर नगर पंचायत निवडणुकीत उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांना मोठ्या मताधिक्याने मतदान करून निवडून द्या हिमायतनगर शहराच्या विकासाचा कायापालट करून सर्वांगीण विकास करू असे सांगितले त्यामुळे देशात नरेंद्र,महाराष्ट्रात देवेंद्र व हिमायतनगरात राजेंद्र यांची सत्ता द्या तुमच्या शहराचा सर्वांगीण विकास करू असे आव्हान केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख,नांदेड जिल्हा संघटनमंत्री तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी  अंबुलगेकर, वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर,भाजपा नेते डॉक्टर अंकुश देवसरकर,तालुका अध्यक्ष गजानन चायल, शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड,यांच्या 

सह हिमायतनगर नगरपंचायत मध्ये उभे असलेले नगराध्यक्ष पदाचे डॉक्टर राजेंद्र वानखेडे,सौ. दर्शना शरद चायल, सौ. सुशीला नागेश डूडुळे, सौ. शिवकन्या परमेश्वर सातव, सौ.सोनूताई रुपेश पोतारे,अनिल शामराव  माने, सौ. इदिरा पंकज मुधोळ कर, आशिष सकवान,भारत डाके, रामेश्वर सूर्यवंशी, दुर्गेश मंडोजवार सह आदी जण उपस्थित होते